आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यातील गाड्यांना अपघात

कणकवली : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तीन दिवसाच्या कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यातील गाड्यांना अपघात झाला आहे. अचानक ब्रेक लावल्यामुळे तीन गाड्यांची टक्कर झाली अन् अपघात झाला.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे मंत्री आदित्य ठाकरे सिंधुदुर्गवरून रत्नागिरीकडे चालले होते. खारेपाटण येथे आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ठाकरे यांच्या गाडीच्या मागे असलेल्या पोलिस सुरक्षा गाडीने अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागे असलेल्या दोन गाड्या त्या गाडीवर आदळल्या. यामध्ये गाड्यांच नुकसान झाले असून सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही.