जिल्हा परिषदेवर प्रशासकराज; पदाधिकार्‍यांची वाहने जमा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा परिषदेतील विद्यमान सदस्यांची रविवारी 20 मार्च रोजी मुदत संपली. सोमवारपासून जिल्हा परिषदेचा कारभार प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाची सूत्रे घेतली.


जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची रविवारी मुदत संपल्याने त्यांना वाहने जमा करण्याबाबत प्रशासनाकडून लेखी पत्र देण्यात आले होते. सोमवारी सर्व पदाधिकाऱ्यांची वाहने जिल्हा परिषदेकडे जमा केली आहेत. तसेच पदाधिकाऱ्यांकडे असणारे स्वीय सहाय्यक व शिपाई यांना त्यांच्या आहे त्या ठिकाणी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, त्यानुसार ते कर्मचारी त्या ठिकाणी आज हजर झाल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

गेल्या पाच वर्षात कोरोनाचा कालावधी वगळता
जिल्हा परिषदेमध्ये पदाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर त्याचबरोबर दालनामध्ये मोठी वर्दळ पाहायला मिळायची, सोमवारी पदाधिका-यांच्या दालनाबाहेर शुकशुकाट होता. मात्र प्रशाशकाना कामानिमित्त भेटण्यासाठी येणाऱ्यांची संख्या खूपच होती.त्यांच्या दालना बाहेर मोठया प्रमाणात नागरिकांची गर्दी होती.