झोपडपट्टीतील लहान मुलांना फूड किटचे वाटप

कोल्हापूर : सांगली मिशन सोसायटी संचलित रेल्वे चाईल्ड लाईन व इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज यांच्या संयुक्त विद्यमाने हातकणंगले, गांधीनगर, टेंबलाई नाका येथील झोपडपट्टी परिसरातील लहान मुलांना फूड किटचे वाटप करण्यात आले.

यावेळी रेल्वे चाईल्ड लाईन कोल्हापूरचे प्रकल्प समन्वयक अभिजित बोरगे, समुपदेशिका गौरी रावण, स्वयंसेवक व इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजच्या अध्यक्षा शर्मिष्ठा खोत, सुरेखा माने आदी सदस्य उपस्थित होते.