इस्लाम हा आपल्या देशाचा खरा शत्रू : संभाजीराव भिडे

पुणे : ज्या इस्लामच्या पोटतिकडीतून औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान केलं, तो इस्लाम हा आपल्या देशाचा खरा शत्रू आहे, असं वादग्रस्त विधान शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी केले आहे.

   संभाजी महाराज बलिदानासंदर्भात शिरूर येथे पत्रकारांशी भिडे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, देशाचे तुकडे तुकडे करून हिंदूस्थान, हिंदू समाज संपून टाकावा, ही त्याच्या पोटातील आग आणि चीड, दृष्ट भावना त्याने संभाजी महाराजांच्या बलिदानातून पूर्ण करुन घेत अंशत: समाधान मिळवलं. औरंगजेब आजही पाकिस्तान, बांग्लादेशच्या रूपाने अजूनही गावोगावी शिल्लक आहे. ज्या इस्लामच्या पोटतिकडीतून औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान केलं, तो इस्लाम हा आपल्या देशाचा खरा शत्रू आहे. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असणारे भिडे या सामाजिक द्वेष पसरविणाऱ्या वक्तव्यामुळे वादात सापडणार आहेत.