…अन्यथा अंदुर- शेणवडे रस्त्यावरील भराव उकरणार

गगनबावडा (प्रतिनिधी) : गगनबावडा तालुक्यातील अंदुर- शेणवडे रस्त्यावर नवीन मोठा पूल बांधण्याचे काम चालू आहे त्या पुलाला दोन्ही बाजूला भराव टाकला आहे. परंतु उत्तरेकडील बाजूला भराव न टाकता पूलवजा मोरी व्हावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. या मागणीसाठी एक दिवशीय उपोषणही केले. मोहरीवजा पुलाचा निर्णय न झाल्यास रस्त्यावरील भराव उकरण्याचा इशारा देण्यात आला आहे.

 अंदुर-शेणवडे रस्त्यावर पुलाचे काम सुरु आहे. पुलाच्या भरावामुळे शेतीचे नुकसान होणार आहे. त्यामुळे छोटे पिलर उभारून पाणी जाण्यास वाट करून द्यावी, अशी मागणी आहे. याबाबत एक महिन्यापूर्वी जोपर्यंत मोरी वजा पुलाचा निर्णय होत नाही तोपर्यंत स्लोपींगचे काम थांबवतो असे अधिकारी देशपांडे यांनी सांगितल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी सांगितले. मात्र, लगेच दोन दिवसांनी कंत्राटदाराने कोणालाही न जुमानता काम चालू केले. यासंदर्भात मोरी वजा पूल होण्यासाठी अधिकारी देशपांडे यांनी स्वतः हजर न राहता संबंधित अधिकारी पाठवले होते. यावेळी काही शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार थांबलाच पाहिजे व या ठिकाणी शेतकऱ्यांना शेती विकण्याची वेळ आली आहे. यासंदर्भात जर न्याय नाही मिळाला तर स्वखर्चाने सर्व शेतकरी मिळून व बाजारपेठेतील सर्वदुकानदार मिळून भराव काढून टाकू, असे प्रकाश पाटील म्हणाले.

 यावेळी उपस्थित भिवाजी वरेकर, बाळकृष्ण गावकर, कृष्णात चिले, योगेश गावकर, अनिल लटके, विवेक सनगर, युवराज पाटील इतर कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.