मुंबई : येत्या काही दिवसात ठाकरे सरकारमधील १० मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागणार असल्याचा खळबळजनक दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केला आहे.
सध्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. रकारमधील मंत्रांनी केंद्रीय तपास यंत्रणेवर आरोप केले असून राजकीय विरोधकांची कोंडी करून त्यांना अडचणीत आणून या यंत्रणा भाजपच्या राजकारणाला हातभार लावतात, अशी टीकाही केली आहे. दुसरीकडे राज्य सरकारने देखील भाजपाच्या काही माजी मंत्र्यांवर कारवाईचे संकेत दिले आहेत. . या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका करताना हा दावा केला आहे. पाटील म्हणाले, सध्या चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दरेकर यांना अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. २० दिवस झाले, एक कॅबिनेट मंत्री जेलमध्ये असतो आणि तुम्ही त्याचा राजीनामा घेत नाहीत.