सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सीपीआरमध्ये ठिय्या

कोल्हापूर: सीपीआरमधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी निवृत्ती वेतनाच्या मागणीसाठी अधिष्ठाता कार्यालयासमोर आज ठिय्या आंदोलन केले.

    सीपीआर हॉस्पिटल मधील वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांना गेल्या तीन ते चार वर्षापासून सेवा निवृत्तीचा लाभ मिळालेला नाही याबाबत अधिष्ठाता कार्यालयाला वारंवार लेखी निवेदन देऊन व प्रत्यक्ष भेट घेऊनसुद्धा याबाबत  कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. अधिष्ठाता कार्यालयातर्फे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तके वेळेत तयार केली जात नाहीत, त्यामुळे कर्मचाऱ्यांना वेळेवर निवृत्ती वेतन मिळत नाही त्यामुळे या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी अधिष्ठाता कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

  आंदोलनात संजय क्षीरसागर, चरणदास घावरी, श्रीमती संजीवनी दळवी, श्रीमती श्रीमंतीनी पाटील, विजय गोवेकर, संजय शिंदे, लियाकत पटेल, स्वाती क्षिरसागर आदी सहभागी झाले होते. या आंदोलनाची दखल न घेतल्यास बेमुदत आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा यावेळी संजय क्षीरसागर यांनी दिला.