कोल्हापूरात महावितरण कार्यालयात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

कोल्हापूर (प्रतिनिधी): येथील महावितरण कार्यालयात कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयात शेतकरी निवास पाटील यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. निवास पाटील यांनी अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला.अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला.

महावितरणने जिल्ह्यातील बीड, महे, वाशी येथील ग्रामस्थांना नोटीस न देता वीज कनेक्शन तोडले आहे. यामळे या गावातील नागरिक संतप्त आणि आक्रमक झाले आहेत. हे सर्व ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयात येत वीजतोडणी प्रकरणी आक्रमक पवित्रा घेतला.दरम्यान महावितरणचे अधिकारी आणि गावकरी यांच्यामध्ये शाब्दिक खडाजंगी झाली.