कळे: आदर्श कॉलेज विटा या ठिकाणी झालेल्या शिवाजी विद्यापीठ आंतर विभागीय सायकलिंग स्पर्धेमध्ये विठ्ठलराव पाटील महाविद्यालय, कळे ने घवघवीत यश संपादन केले, सदर स्पर्धेमध्ये एकूण 30 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला होता.
यामध्ये सातारा, सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यातील खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला होता, या स्पर्धेमध्ये कळे महाविद्यालयातील अमन अभिजीत व हेमंत या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व राखत महाविद्यालयास सुवर्ण, सिल्व्हर, ब्राँझ पदकांची कमाई केली व अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ सायकलिंग संघामध्ये आपली पात्रता मिळविली, मुलींच्या गटामध्ये सुद्धा कळे महाविद्यालयाची स्वप्नाली ने संघर्ष करून ब्राँझ पदक , पटकावले त्यामध्ये
मुलामधून
प्रथम क्रमांक –अमन तांबोळी
द्वितीय क्रमांक- अभिजीत कडवेकर
तृतीय क्रमांक- हेमंत लोहार.
मुली मधून
स्वप्नाली संकपाळ (Sutar) तृतीय क्रमांक.
सर्व खेळाडूंना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कमलाकर राक्षसे महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. विक्रम यमगेकर व संस्था प्रतिनिधी डॉ. नितीन पाटील यांचे मोलाचे सहकार्य मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. विजय खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे.