पाचगावात पतीकडून पत्नीचा खून

कोल्हापूर : पाचगाव (ता. करवीर) येथे पती-पत्नीमध्ये वारंवार होत असलेल्या वादातून पतीने लाकडी काठीने मारहाण करून पत्नीचा खून केल्याची घटना घडली आहे. अरुणा विजय पवार (वय २८) असे खून मृत महिलेचे नाव आहे. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. पती विजय पवार याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, पाचगावमधील हायस्कूल चौकातील एका घरात हादनाळ (ता. चिकोडी) येथील पवार दाम्पत्य एक वर्षापासून भाड्याने राहतात. संशयित विजय पवार हा सेंट्रींगची कामे करतो. गेल्या काही दिवसांपासून पासून पती-पत्नीमध्ये वाद सुरू होता. आज सकाळी पुन्हा त्यांच्यात वाद झाला. या रागातून विजय पवार याने सायंकाळी आठच्या सुमारास लाकडी काठीने पत्नी अरुणाला बेदम मारहाण केली. यात डोक्याला जबर मारहाण झाल्याने अरुणाचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी रात्री उशिरा हल्लेखोर पती विजय पवार याला ताब्यात घेतले आहे.