बालिंगा (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू प्रशांत सावंत व रत्नागिरी क्रिकेट असोसिएशनच्यावतीने दापोली (जि. रत्नागिरी) येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या विजय क्रीडा संकुलात होणाऱ्या दिव्यांगाच्या क्रिकेट स्पर्धेसाठी कोल्हापूरची टीम रवाना झाली.
या स्पर्धेत रत्नागिरी, मुंबई, सोलापूर, अहमदनगर, रायगड आणि कोल्हापूर संघ सहभागी होत आहे. कोल्हापुर संघात कर्णधार दिपक इंजल (गडहिंगलज), उपकर्णधार मयूर शिंगाडी (हातकलगले), विकास आनूसे (शाहूवाडी), राजू रावळ, शाहरूख ताबोळी, धमेंद्र श्रीवास्तव, अमित शेटके , अमोल संकान्ना (हातकणगले), देवदास कदम (कोल्हापुर), रोहित गाडवे (शिरोळ ), योगेश पवार (कागल ), राजू सूतार (इचलकरंजी) बाबुराव पाटील (करवीर) नारायण मडके (टिम मॅनेजर) अतूल धनवडे व उत्तम चौगले व प्रभाकर पाटील (प्रक्षिशक ) यांचा समावेश आहे. .
विजय नलवडे (विस्तार अधिकारी प. स. करवीर) निलेश कुंभार ( ग्रामसेवक वाशी) शिवाजी वाडकर (ग्रामसेवक आमशी) यांनी कोल्हापुर संघाचे प्रायोजिकत्व स्विकारले आहे. ग्रामसेवक निलेश कुंभार यांनी कोल्हापुर संघास क्रिकेट साहित्य प्रदान करणेत आले. तसेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे प्रशिक्षक केदार गयावळ यांनी प्रशिक्षणाची जबाबदारी स्विकारली आहे.