वाकरे फाट्यावर डंपर- टेम्पोची समोरासमोर धडक; दोघे जखमी

बहिरेश्वर : वाकरे- कुडित्रे फाट्याजवळ गणेश नाळवा येथे डंपर आणि टेम्पोची समोरासमोर धडक झाल्याने दोघेजण जखमी झाले. विनायक जाधव व जयदीप जाधव अशी जखमींची नावे असून त्यांना कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनास्थळावर मिळालेली माहिती अशी, कोल्हापूर येथील भारत डेअरीकडे (एमएच ०९ ईएम८३६२ ) हा टेम्पो वाहतुकीसाठी भाडेतत्वावर आहे . बाजारभोगावचा रूट करून ते कोल्हापूरकडे जात होते तर खडी घेवून साळवणकडे जाणाऱ्या डंपरची (एमएच ०९सीक्यू ००८८) वाकरे- कुडित्रे फाट्याजवळ गणेश नाळवा येथे समोरासमोर धडक झाली. धडक इतकी भीषण होती की टेम्पोच्या पुढील बाजूचा चक्काचुर झाला. चालकाला बाहेर काढण्यासाठी पत्रा कापावा लागला. यात विनायक जाधव व जयदीप जाधव हे जखमी झाले असून टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नागरिकांनी रुग्णवाहिकेतून त्यांना तात्काळ कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल पाठवले.