जयप्रभा स्टुडिओ बचावच्या मागणीसाठी मूक मोर्चा

कोल्हापूर : कोल्हापूरची अस्मिता असलेल्या जयप्रभा स्टुडिओ बचावच्या मागणीसाठी गेल्या १९ दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. आज आंदोलनकर्त्यांनी चेहऱ्यावर मुखवटे व हातात फलक घेऊन शहरातून मूक मोर्चा काढला.

जयप्रभा स्टुडिओ बचाव, भालजीबाबांची अस्मिता जपूया, अशा घोषणा देत खरी कॉर्नर येथून मोर्चाला प्रारंभ झाला. हा मोर्चा महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका, शिवाजी पुतळा, बिंदू चौक, मिरजकर तिकटी मार्गे जयप्रभा स्टुडिओ पर्यंत काढण्यात आला. आंदोलनकर्त्यांच्या चेहऱ्यावर मुखवटे व हातात फलक विविध फलक होते.

मोर्चामध्ये मराठी चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर, अभिनेता स्वप्नील राजशेखर, राहुल राजशेखर. माजी नगरसेवक विजय साळोखे, तालीम मंडळाचे सदस्य, नाट्यप्रेमी तसेच नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते.