जोतिबा : दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या उन्मेष अश्वाचे बुधवारी सायंकाळी चार वाजता निधन झाले.
दोन दिवसांपासून उन्मेष आजारी होता. तर आज सकाळपासून त्याला अशक्तपणा होता. त्याच्यावर तात्काळ उपचार सुरू केले होते. मात्र, दुपारी चारच्या सुमारास त्याचे निधन झाले.
उन्मेषच्या निधनाचे वृत्त समजताच जोतिबा डोंगर परिसरातील भाविकांनी अंतिम दर्शनसाठी गर्दी केली. मंदिर परिसरातून ट्रॉलीतून अत्यंयात्रा काढली. दक्षिण दरवाजाजवळ अंत्यविधी करण्यात आले.
गेली १२ वर्षे उन्मेष जोतिबा देवाच्या सेवेत होता. पालखी, धुपारती सोहळ्यात सहभागी असायचा..