कोल्हापूर : शेतीपंपास दिवसा वीज द्या या मागणीसाठी शुक्रवारी राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
कोल्हापूर येथील महावितरण कार्यालयासमोर गेल्या नऊ दिवसापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. पण आंदोलनाकडे शासन जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याच्या आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. बुधवारी संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली यात हा निर्णय झाला. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, शेतीपंपास दिवसा वीज आपला हक्क आहे. याकरिता राज्यातील सर्व शेतकर्यांनी शुक्रवारी, ४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता राज्यभर ग्रामीण भागात चक्काजाम आंदोलन करून आपली ताकत दाखवून द्यावी.