आजचं राशीभविष्य बुधवार, २ मार्च २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही स्वीकार करा. आज तुमच्यासाठी काय वाढून ठेवले आहे, ते पाहूया..
मेष:-
अधिकारी लोकांची गाठ पडेल. ओळखीचा फायदा करून घेता येईल. गप्पिष्ट लोकांचा सहवास लाभेल. नवीन मित्र जोडता येतील. व्यावसायिक लाभाकडे लक्ष ठेवा.
वृषभ:-
कामात खंड पडू देऊ नका. तुमच्या व्यक्तिमत्वाचा दबदबा राहील. मनात नवीन आकांक्षा रूजतील. गैरसमजाला खतपाणी घालू नका. कामातून समाधान शोधावे.
मिथुन:-
कलेसाठी लागणारे साहित्य खरेदी कराल. व्यापार्यांना चांगला आर्थिक लाभ होईल. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल. करमणुकीचे कार्यक्रम पहाल.
घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील. शांत व संयमी विचार कराल. कौटुंबिक जबाबदारी लक्षात घ्यावी. भावंडांची काळजी लागून राहील. धार्मिकतेत चांगली वाढ होईल.
सिंह:-
प्रवासाचा आनंद घ्याल. मित्र मैत्रिणींचा गोतावळा जमवाल. अचानक धनलाभ संभवतो. कमी श्रमात कामे करण्यावर भर द्याल. भागिदारीतून चांगला लाभ होईल.
तुळ:-
सर्वांशी खिलाडु वृत्तीने वागाल. व्यसनाच्या आहारी जाऊ नका. प्रवासात सतर्कता बाळगावी. गोष्टींचे गांभीर्य लक्षात घेऊन वागावे. तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पडेल.
वृश्चिक:-
पराक्रमाला चांगला वाव मिळेल. हातातील कामे आधी पूर्णत्वास न्यावीत. खाण्या-पिण्याची पथ्ये पळावीत. कलात्मक दृष्टीकोन ठेवाल. आत्मिक समाधान शोधावे.
धनू:-
स्पष्ट, पण खरे बोलाल. घरगुती कार्यक्रम काढले जातील. जुनी येणी वसूल होतील. घरातील स्वच्छता आवडीने कराल. वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल.
मकर:-
कौटुंबिक जबाबदारी वाढू शकते. हस्तकलेसाठी वेळ काढावा. नियमांचे उल्लंघन करू नका. कोर्ट-कचेरीच्या कामात त्रास संभवतो. डोळ्यांची वेळेवर काळजी घ्यावी.
कुंभ:
वाढत्या कामामुळे थकवा जाणवेल. मनातील अनामिक भीती काढून टाकावी. कामाची घडी नीट बसवावी. कौटुंबिक सौख्य उत्तम लाभेल. काही खर्च आकस्मिक होऊ शकतात.
मीन:-