निवडणूक प्रमुखपदी राहुल चिकोडे; चंद्रकांतदादा यांच्याकडून घोषणा
कोल्हापूर : आगामी कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या प्रभारीपदी माजी खासदार धनंजय महाडिक यांची तर निवडणूक प्रमुखपदी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांची निवड प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली.
आगामी कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे विविध पातळ्यांवर मोर्चेबांधणी केली जात आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजप व ताराराणी आघाडीने जोरदार ताकद लावली होती. पण सत्तेपर्यंत पोहोचता आले नव्हते. त्यामुळे भाजपने यावेळी जोरदार कंबर कसली आहे.
त्यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील पाटील यांनी मोर्चेबांधणी केली आहे.तगडे उमेदवार रिंगणात उतरवले जाणार आहेत. त्याची तयारी सुरू झाली असून नवीन प्रभाग रचनेची गणिते यांचा अभ्यास सू आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता पक्षाकडून जोरदार तयारी केली जात आहे. आणि त्याचसाठी माजी खासदार धनंजय महाडिक यांची प्रभारीपदी तर पक्षाचे शहराध्यक्ष राहुल चिकोडे यांची निवडणूक प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.