उचगाव: उचगाव (ता.करवीर) येथील आरती ज्ञानोबा पाटील हिची स्पेन येथे दि 1 मार्च ते 6 मार्च आणि 8 मार्च ते 13 मार्च रोजी होणाऱ्या आंतररष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहे तसेच तिला 2022 मध्ये होणाऱ्या 14 अंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे लागणार आहे व यासारखा स्पर्धांमध्ये सहभागी झाल्याने तिच्या रँकिंगमध्ये वाढ होऊन तिची एशियन साठी व वर्ल्ड चॅम्पियन साठी या स्पर्धांसाठी तिची निवड होईल तिच्या यशदायी प्रवासाबद्दल उचगाव परिसरात कौतुक होत आहे.तिच्या या गगनभरारी यशाने गावकरी,खेळाडूच्यात चैतन्य पसरले आहे.
भारताचे प्रतिनिधीत्व करणारी ती एकमेव पॅरा बॅडमिंटनपटटू आहे.त्यामुळे उचगावच्या आरती पाटीलने कोल्हापुरचा झेंडा अटकेपार रोवला आहे.मुळात घरची परिस्थिती बेताची असलेल्या आरतीला दोन बहिणी असून एक बहीण विवाहित आहे तर एक बहीण शिक्षण घेत आहे. व भाऊ प्रसाद पाटील हा गवंडी काम करत शिक्षण घेत आहे.आर्इ भारती ज्ञानोबा पाटील गॄहिणी आहे. वडिल ज्ञानोबा पाटील हे गंवडी काम करतात. वेगवेगळया स्पर्धाच्या निमित्यांने आरतीला दानशुरांनी आर्थिक मदत केली. त्यामुळे अनेक देशात सुरू असलेल्या व नियोजित स्पर्धांमध्ये तिने दैतीमान यश मिळवले आहे. तिच्या मदती साठी पाठीशी नेहमी खंबीरपणे उभारणारे अजय रावळ सर आहेत . या स्पर्धेसाठी चंद्रकांत दादा पाटील यांची व सत्यम पटेल (ओनर ऑफ इको प्रो कंपनी आणि प्रेसिडेंट ऑफ लक्ष फाउंडेशन )मोठी मदत मिळाली आहे यांचे तसेच शाहू कारखाना मार्गदर्शन मिळते तसेच प्रशिक्षक अनिकेत मेहेरा,(बॅडमिंटन कोच) शेखर कुदळे (फिटनेस कोच) संदीप डांगे .रोहित दिक्षित (पुणे) व. हिंदुस्तान पेट्रोलियम या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. आरती पाटील हिने आजवर भरीव अशी कामगिरीकेली आहे.
आरती ही जन्मजात एका हाताने दिव्यांग आहे.आर्इवडिलांनी तिच्या या दिव्यांगाला स्विकारत तिला वेळोवेळी प्रोत्साहन दिले. आतापर्यत तिने मैदानी खेळ,गोळाफेक,बॅडमिंटन,अशा विविध खेळात जिल्हा स्तर ,राज्यस्तर,तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनिय कामगिरी केली आहे.आज तिच्या नावावर एकुण २१ सुवर्णपदक,९ कांस्यपदक, १० रौप्यपदके व अन्य पुरस्कार तिने प्राप्त केले आहेत.आंतरराष्ट्रीय स्तरावर ती यापुढे चमकदार कामगिरी करण्याचा मानस तिने व्यक्त केला.