कोल्हापूर: महावितरणच्या वीज निर्मिती मध्ये साखर कारखान्यापेक्षाही सर्वात मोठा घोटाळा असून तो लवकरच चव्हाट्यावर आणू. कंपनीमध्ये मंत्र्यांचे लागेबंधे आहेत. जनतेच्या पैशाची सरकारकडून लूट सुरू आहे.
शेतकर्यांची वाटोळे महाविकास आघाडी सरकार करत असेल तर मंत्र्यांनाही तुडवू . राज्यातील जनतेला लुबाडायचे व त्यांच्या घरावर दरोडे घालायचे धंदे बंद करावे, असा घणाघात यावेळी राजू शेट्टी यांनी केला. अशी बोचरी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शेतीला सलग १० तास दिवसा वीज द्या या मागणीसाठी दुसर्या दिवशीही महावितरणच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू होते. यावेळी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या पुतळ्याचे दहन राजू शेट्टींनी केले.
मंत्रालयाच्या दालनांची वीज अहोरात्र सुरू असते. मंत्रालयात देखील दारूच्या बाटल्या सापडू लागल्या आहेत. तिथे हीच धंदे सुरू असतात काय? मंत्र्याचे दालने दिवसाही विजेने चमकत असतात. सरकारच्या तिजोरीतून पैसा उचलून विजेची बिले भागवली जातात. अन्नदात्या शेतकर्यांना महाविकास आघाडी सरकारकडून नागवले जात आहे. माणसापेक्षा जंगली प्राण्यांची किंमत जास्त आहे. विजेचा धक्का लागून हत्ती मारला गेला तर नुकसान भरपाई २५ कोटीची वसुली शेतकर्यांकडून केली जाते. शेतकर्याला विजेचा धक्का बसून मृत्युमुखी झाला तर केवळ २ लाख रूपये नुकसान भरपाई दिली जाते.या तीन कुबड्याच्या सरकारने शेतकर्यालाच अस्थिर केले आहे.
राज्यात धरणे बांधली गेली, जमिनी शेतकर्यांच्या घेतल्या गेल्या. पुर्नवसन देखील शेतकर्याच्या जमिनीवर केला गेला. सरकारमधील मंत्र्यांना सत्तेची मस्ती आली आहे. मस्तीत व सत्तेच्या धुंदीत जनता तुम्हाला रस्त्यावर आणेल, असा इशाराही यावेळी दिला. यावेळी प्रा. जालंधर पाटील, राजेंद्र गड्ड्यान्नावर, जनार्दन पाटील, जयकुमार कोले, सागर कोंडेकर, सचिन शिंदे, विक्रम पाटील, सागर संभूशेटे, शैलेश आडके, अजित पवार, राम शिंदे .पोपट मोरे , शमसुद्दीन सनदे , डाॅ. बाळासाहेब पाटील , विक्रम पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येेने उपस्थित होते.