राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने पुकारलेला संप स्थगित __अनिल लव्हेकर

राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने दोन दिवसांच्या संपाचे आयोजन करण्यात आले होते. काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बरोबर झालेल्या चर्चेत सकारात्मक निर्णय घेण्यात आले.

या मध्ये शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करणे खाजगीकरणाचे धोरण न राबवणे मालकधार्जिणे कायदे न राबवणेशिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना कालबद्ध पदोन्नती देण्याबाबत आदेश देणे याबाबत निर्णय घेण्यात आले अशी माहिती अनिल लव्हेकर यांनी दिली.

दरम्यान आज जिल्ह्यात राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या संपाला चांगला प्रतिसाद मिळाला.जिल्हाधिकारी कार्यालय तहसीलदार कार्यालय पंचायत समिती जिल्हा न्यायालय आदी ठिकाणचे कर्मचारी संपावर गेल्याने तेथील कामकाज विस्कळित झाले.