गोड साखर ऊस, ऊस बिले व तोडणे वाले जमा

गडहिंग्लज: हरळी येथील आप्पासाहेब नलवडे गडिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना लिमिटेड हरळी यांचेकडून गळीत हंगाम 2021 22 मध्ये डिसेंबर 2021 अखेरची आलेली उसाची बिले विनाकपात प्रति टन 2900 प्रमाणे तोडणी बिले ऊस पुरवठादार सभासद व बिगर सभासद तोडणी वाहतूकदार कंत्राटदार यांचे बँक खात्यात 17 फेब्रुवारी रोजी जमा करण्यात आली आहे.

तरी ऊस पुरवठा सभासद बिगर सभासद व तोडणी वाहतूक कंत्राटदार संबंधित बँकेशी संपर्क साधून रक्कम उचल करावी अशी विनंती साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीपतराव शिंदे व उपाध्यक्ष संग्राम सिंह नलवडे संचालक मंडळाने केली आहे.