सुळकूड येथे व्याख्यान व गुणवंतांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन

सुळकूड: सुळकूड (ता. कागल) येथे स्वामी विवेकानंद विद्यार्थी संघटने कडून व्याख्यानमाला व विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार समारंभ चे आयोजन करण्यात आले आहे .

सदरचे कार्यक्रम मंगळवारी दि. २२रोजी दोन सत्रात होणार आहे सकाळच्या सत्रात प्रमुख पाहुणे कागल चे तहसीलदार सौ . शिल्पा ठोकडे , व कागल पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले हे उपस्थित असणार आहेत व दत्तात्रय गायकवाड यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील स्वराज्य व आजचा महाराष्ट्र या विषयावर व्याख्यान होणार आहे , दुसऱ्या सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून राजे समरजितदादा घाटगे (जिल्हा अध्यक्ष कोल्हापूर )व पृथ्वीराजदादा यादव ( जिल्हाध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा कोल्हापूर)श्री वसंत भोसले (मुख्य संपादक , लोकमत कोल्हापूर आवृत्ती ) यांचे , बदलती जीवनशैली या विषयावर व्याख्यान होणार आहे व विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार होणार आहे असे स्वामी विवेकानंद विद्यार्थी संघटनेचे अमोल शिवई माहिती दिली आहे.