इचलकरंजी/मन्सूर अत्तार : इचलकरंजी शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार शलमोन उर्फ शल्या सुरेश कांबळे (वय २०) रा. कुष्ठरोग वसाहत या रेकॉर्डवरील गुन्हेगारास कोल्हापूर जिल्ह्यातून ६ महिन्यांसाठी हद्दपार केले आहे.
सदर आरोपीवर इचलकरंजी व शिवाजीनगर पोलीस ठाणेस खुनाचा प्रयत्न, घरफोडी व चोरी यासारखे गंभीर स्वरूपाचे ६ गुन्हे दाखल आहेत. या हद्दपारीच्या प्रस्तावाची चौकशी पोलीस उपअधीक्षक बी.बी. महामुनी, यांनी तयार करून प्रांताधिकाऱ्यांच्या सादर केले असता या रेकॉर्ड वरील आरोपीस कोल्हापूर जिल्हयातून ६ महिन्याकरीता हद्दपार करण्याचे आदेश प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी दिले आहेत.सदरचा हद्दपार प्रस्ताव गावभाग पोलीस ठाण्यातील पो.ना. सचिन मगदूम यांनी तयार केला असून सदर प्रस्तावाच्या चौकशी अहवालाचे काम पो.ना. सागर हारगुले यांनी पाहिले.