कोल्हापुर – लमान बंजारा समाजातील लोकांना बँकांनी कर्ज पुरवठा करावा. मतदान संघात या लोकांची नावे समाविष्ट करावीत. दारिद्र्यरेषेखालील नावे समाविष्ट करावी स्वतंत्र आश्रम शाळा सुरू करावी. यासह 11 ठराव लमान समाज विकास संघाच्या मेळाव्यात संमत करण्यात आले येथील शाहू स्मारक भवन येथे हा मेळावा झाला मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते अमर पाटील शिंगणापूर हे होते.
या कार्यक्रमात बोलताना अमर पाटील म्हणाले देश स्वातंत्र्यानंतर हा लमान समाज विकासापासून वंचित आहे. त्यांना पुरेशा सोयी-सुविधा मिळत नाहीत.महागाईमुळे या लोकांना उपासमारीची वेळ आली आहे.ना घर ना दार अशी परिस्थिती आहे. या समाजातील लोकांसाठी शासन व जिल्हापरिषदे मार्फत योजना देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी दिले.या कार्यक्रमाच्या निमित्ताने संत श्री सेवालाल महाराज जयंती कार्यक्रमी घेण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत लमान समाज अध्यक्ष रामचंद्र पवार यांनी केले. कार्यक्रमास बबनराव राणगे,अशोक राणगे,विमल राठोड,संतोष राठोड, सुनील राठोड, आदी समाजातील लोक उपस्थित होते.