कोल्हापूर : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा शर्मा यांनी शिवशक्ती या नवीन पक्षाची घोषणा केली असून आता त्यांनी त्यांचा पक्ष कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे.
येथून योग्य उमेदवार न मिळाल्यास स्वत: मैदानात उतरण्याची तयारीही त्यांना दाखवली आहे.आगामी लोकसभा, विधानसभा, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पोटनिवडणुका अशा सर्व निवडणुका लढवण्याचे शर्मा यांनी जाहीर केले आहे. या निवडणुकांमध्ये शिवशक्ती पक्षाचे उमेदवार मैदानात असतील. याची सुरवात कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीतून होणार आहे.
तेथे पक्ष उमेदवार उभा करणार आहे. योग्य उमेदवार न मिळाल्यास स्वत: निवडणक लढवण्याची तयारीही त्यांनी दाखवली आहे.याबाबत बोलताना करूणा शर्मा म्हणाल्या की, यापुढे जिथे पोटनिवडणूक असेल तिथे आमच्या पक्षाचा उमेदवार असेल. कोल्हापूरमध्ये दोन-तीन जणांशी आमची बोलणी सुरु आहेत. यात उत्तम कागले, अजय देढे या सामाजिक कार्यकर्त्यांसह इतर दोन राजकीय व्यक्तींचा समावेश आहे. त्यांच्या नावाची घोषणा नंतर करण्यात येईल.