कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या गडहिंग्लज शाखेत 35 लाख 76 हजार रुपये लॉकर मध्ये सुरक्षित आहेत. शाखा व्यवस्थापक अरुण जाधव यांनी स्वतः हजर होऊन रोख रक्कम व इतर कागदपत्र संस्थेकडे जमा केले आहेत. याबाबतची माहिती आज (शनिवारी) संस्थेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
संस्थेकडून देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात असे म्हटले आहे जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या गडहिंग्लज शाखेचे व्यवस्थापक अरून अशोक जाधव हे १४ जानेवारी २०२२ पासून रजा अर्ज पाठवून परस्पर रजेवर गेले होते व त्यांचा पदभार अन्य संस्थेच्या कर्मचाऱ्याचकडे न देता रजेवर गलेने संस्थेमध्ये संभ्रम झाला होता. याबाबत त्यांना नोटीस काढून तात्काळ पदभार व लॉकर किल्ली देणे बाबत कळविले होते. तथापी ते हजर न झालेने कायदेशीर कार्यवाही करणे बाबत संचालक मंडळाने निर्णय घेतला होता व त्याबाबत कार्यवाही चालू होती. दरम्यान शुक्रवार ११ फेब्रुवारी २०२२ रोजी अरून अशोक जाधव हे गडहिंग्लज शाखेत समक्ष हजर होऊन हजर रिपोर्ट देवून त्यांचा पदभार व लॉकरसह सर्व किल्ल्या सादर केल्या आहेत.
जाधव हे त्यांच्या घरगुती वैयक्तिक कलहातुन मनस्थिती बरोबर नसलेने परस्पर रजेवर गेले बाबत हजर रिपोर्ट मध्ये नमूद केले असून त्यांनी जि.प. सोसायटी मध्ये गेली २१ वर्षे सेवा केली व संपूर्ण सेवेमध्ये कार्यतत्पर राहून संस्थेची प्रामाणीक सेवा करून संस्थेचा नावलौकीक वाढवणेकामी प्रयत्न केले असलेचे नमूद करून भविष्यात ही प्रामाणीक सेवा करणेचे हजर रिपोर्ट मध्ये नमूद केले आहे. असेही या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.संस्थेमध्ये १४ जानेवारी २०२२ रोजी गडहिंग्लज शाखेची रक्कम रु.३५ लाख ७६ हजार रकम शिल्लक होती व दि. ११ फेब्रुवारी २०२२ रोजी पदभार दिलेनंतर तितकी रक्कन लॉकर मध्ये शिल्लक असले निदर्शनास आले आहे. गडहिंग्लज शाखेमध्ये व्यापारी वर्ग व सभासद मोठ्या प्रमाणात असलेने त्यांना त्यांचे मागणी प्रमाणे रक्कम देणे क्रमप्राप्त ठरते त्यामुळे सदर रक्कम शाखेमध्ये असून बँकेच्या सुट्टी दिवसी त्यांची आर्थीक गैरसोय हाऊनये म्हणून रोख शिल्लक ठेवली होती.
अरुन जाधव हे स्वतः हजर होऊन रोख शिल्लक रक्कम व लॉकरसह अन्य रेकॉर्ड सुपूर्द केलेने संस्थेच्या संचालक मंडळासह सर्व सभासद हितचिंतक ठेवीदार यांचा संभ्रम दूर झाला आहे. संस्थेचा कारभार अत्यंत चांगल्या प्रकारे चालू आहे. सभासदाचे हिताचे दृष्टीने कजांचे व्याजदर १० टक्के पर्यंत खाली आणला आहे.
संस्थेच्या उत्पन्नवाढीसाठी विविध उपक्रम राबवून संस्थेचा कारभार पारदर्शक करून संस्थेचा नावलौकीक वाढलेला आहे व सर्व सभासद, हितचिंतक ठेवीदार व संस्थेचे सर्व कर्मचारी यांचे बहुमोल योगदान मिळाले आहेच भविष्यातही संस्थेमार्फत सभासदांना आणखी उपयुक्त सुविधा पुरविणे बाबत संचालक मंडळ कार्यतत्पर राहिल असे अभिवचन या प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आले आहे. या प्रसिद्धी पत्रकावर संस्थेचे चेअरमन राजीव परीट, व्हा. चेअरमन दिनकर तराळ व्यवस्थापक व्ही. एन. बोरगे यांच्या स्वाक्षर्या आहेत.