सरसेनापती अग्रोच्या गारगोटी जनसंपर्क कार्यालयाचा उदघाटन सोहळा संपन्न

कोल्हापूर: सरसेनापती अग्रो चे गारगोटी जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले.

यावेळी सरसेनापती अग्रो च्या भावी वाटचाली साठी पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी शुभेच्छा दिल्या व राधानगरी विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी तसेच आधुनिक शेतीच्या योजना राबवून उत्पादनात वाढ करणेस सहाय्य करेल अशी अपेक्षा व्यक्त केली.यावेळी काँग्रेस चे जेष्ठ नेते एस.एम.पाटील सर यांनी स्वागत केले.

यावेळी संस्थेचे सचिन घोरपडे यांनी प्रास्ताविकात सरसेनापती अग्रो मार्फत मोफत शेतीविषयक मार्गदर्शन, शेतकरी प्रशिक्षण, माती परीक्षण, आधुनिक शेती व्यवस्थापन असे अनेक उपक्रम राबवले जाणार असे नमूद केले. यावेळी संचालक मा. शामरावदादा देसाई, मा. प्रकाश आण्णा देसाई ,मा.सरपंच भुजंगराव मगदूम, संजय गांधी चे सदस्य,बाबासाहेब देसाई, मा.मोहन शिंदे,मा धनाजी कुरळे, मा प्रताप वारके, युवक नेते अमर बरकाळे, अमोल पाटील , एन एस यु आए चे ऋषिकेश पाटील, अजित परीट, बाळासो गुरव उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार मा सुशांत माळवीसर यांनी मानले.