गवारेड्यांच्या झुंजीत गव्याचा मृत्यू

आजरा : गवारेड्यांच्या झुंजीत एका गव्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना आजरा कोल्हापूर रस्त्यावरील मसोबा जवळील सुलगांव जंगलक्षेत्रात रस्त्याकडेला घडली आहे.

घटनास्थळी झुडपे व वेली मोडून पडल्या आहेत. गवारेडा मयत झाल्याची माहिती समजताच नागरिकांनी पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती.गवा रेड्यांचा कळप सुलगाव जंगल व रोपवाटिका परिसरात आहे. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास दोन गव्यांची झुंज लागल्याचे काही नागरिकांनी पाहिले. मात्र भितीने ते त्याठिकाणी न थांबताच निघून गेले. दहाच्या सुमारास त्यातील एक गवा मृतावस्थेत पडल्याचे नागरिकांनी पाहिले. तातडीने याची माहिती वन विभागाला देण्यात आली.