घोडबंदर रोडवर दुधाचा टँकर उलटल्याने वाहतूक कोंडी

गुजरात येथून पुण्याकडे निघालेल्या दुधाच्या टँकरचा ठाण्यातील घोडबंदर रोड अपघात झाल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे काही काळ वाहतुक कोंडी झाली होती.

तसेच या अपघातामुळे रस्त्यावर पसरलेल्या तेलावर माती पसरवून आणि उलटलेल्या टँकर रस्त्याच्या बाजूला करून वाहतुक सुरळीत करण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.हरिष चौधरी यांच्या मालकाचा टँकर त्यांचा चालक अझर समसुद्दीन हा मंगळवारी गुजरात येथून ठाणे घोडबंदर रोड मार्गे पुण्याला निघाला होता. दुपारी 11.40 वाजता घोडबंदर रोडवरील गायमुख जकात नाक्याजवळ टँकर आल्यावर टँकरवरील चालकाचा ताबा सुटला आणि टँकर उलटला. याचदरम्यान टँकर मधून तेल घोडबंदर रोडवरील दोन्ही मार्गिकेवर पसरला. त्यामुळे दोन्ही मार्गिकेवरील वाहतुकीवर परिणाम झाल्याचे पाहण्यास मिळून आले.पुण्याकडे चाललेल्या टँकरमध्ये जवळपास २५ हजार लीटर दूध होते. टँकर उलटल्याने त्यातील ३० टक्के दूध वाया गेले असून उर्वरित दूध दुसऱ्या गाडी भरून नेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.