परशुराम घाटात दरड कोसळली

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असताना आज सकाळी अकरा वाजता परशुराम घाटात दरड कोसळली. यावेळी काम करत असलेले दोन पोकलेन दरडीखाली गेले असून कामगारही अडकले आहेत.

चौपदरीकरणाच्या कामात डोंगर कटाई सुरू असताना ही दुर्घटना घडली. पोकलेने खोदकाम सुरू असताना डोंगराचा भाग खाली कोसळला. कोसळलेल्या दरडीखाली दोन पोकलेन दबले गेले असून चालकही अडकले आहेत. दुर्घटनेनंतर मदतीकरिता यंत्रणा सज्ज झाली असून बचाव पथकाने आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आहे. दरड कोसळल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.