राज्यात आज सार्वजनिक सुट्टी

मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने आज, सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

परक्राम्य संलेख अधिनियमानुसार ही सुट्टी जाहीर करण्यात आल्याने राज्य सरकारप्रमाणेच महाराष्ट्रातील केंद्र सरकारची सर्व कार्यालये, राष्ट्रीयीकृत बँकांही या काळात बंद राहतील.भारतरत्न लता मंगेशकर यांचे दु:खद निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी सोमवारी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. ही सुट्टी राज्य सरकारला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार परक्राम्य संलेख अधिनियमानुसार जाहीर करण्यात आलेली असल्याने सर्व सरकारी कार्यालये, शाळा, केंद्र सरकारची राज्यातील कार्यालये, राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा बंद राहतील.