कोल्हापूर: कोल्हापूर वित्त विभागाकडून कर्मचार्यांच्या भविष्यनिर्वाह निधी बाबतीत सावळागोंधळ सुरू असून, याबाबतीत योग्य ती कारवाई न झाल्यास आपण ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे तक्रार करणार असल्याचा इशारा जि. प. सदस्य विजय भोजे यांनी एका पत्राद्वारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांना दिला आहे.
भोजे यांनी दिलेल्या पत्रात असे म्हटले आहे , जिल्हयातील अनेक विभागातील कर्मचाऱ्याचे भविष्य निर्वाह निधी मधील रकमा हया B.D.S. ही गेली ४ महीने बंद आहे. यामुळे कर्मचाऱ्यांची प्रचंड कोंडी निर्माण झाली आहे. वित्त विभागाकडे चौकशी केली असता हि प्रणाली बंद असल्याचे कारण देत टाळाटाळ करण्याचे प्रकार कर्मचाऱ्यांना भोगावे लागत आहे. पण मध्ये अगदी थोडया काळा करीता हि प्रणाली चालू झाली. नंतर काही कर्मचाऱ्यांनी चोरवांटाचा अधार घेत आपल्या रक्कमा काढून घेतल्या आहेत. परंतूज्यांनी अर्थिक देवघेव केली नाही. अशा प्रामाणिक कर्मचाऱ्यांच्या वर हा अन्याय आहे.तसेच बऱ्याच कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव हे पंचायत समिती पासून कोशागार कार्यालय पर्यंत पडून आहेत. व बऱ्याच वेळी काही अर्थ मिळतो का या कारणासाठी त्रुटी काढून पाठवल्या जात आहेत. कोरोना ने मयत (मरण) पावलेल्या कर्मचाऱ्यांच्याही भविष्य निर्वाह निधीच्या रक्कमाही मिळाल्या नाहीत. हि बाब शोभनिय नाही.राज्य सरकाच्या वित्त विभाग मंत्रालय या ठिकाणी संपर्क करणेसाठी मुख्य लेखापाल यांना सक्त सुचना देऊन कर्मचाऱ्यांवर चाललेल्या हा अर्थिक अन्याय बंद करणेसाठी आपण लक्ष घालावे. अन्यथा याबाबतीत ग्रामविकास मंत्री व पालकमंत्री यांच्याकडे तक्रार केली जाईल. असे ही भोजे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.