रत्नागिरी: देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे 12 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील मंडणगड येथे येणार असल्याचे निश्चित झाले असल्याचे भि.रा. तथा दादा ईदाते यांनी दिली.
महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भटके विमुक्त आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष भि. रा. तथा दादा इदाते यांनी भारतरत्न डॉ. बाबासाबहेब आंबेडकर यांचे मूळगाव आंबडवे ता. मंडणगड भेटीचे निमंत्रण २५ ऑक्टोबर २०२१ रोजी प्रत्यक्ष भेटीत राष्ट्रपतीभवनात दिले होते. त्याला प्रतिसाद देत राष्ट्रपती ०६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आंबडवे येथे भेट देणार होते. परंतु तांत्रिक कारणांमुळे ते शक्य झालं नाही. परंतु आता १२ फेब्रुवारी रोजी महामहिम राष्ट्रपती आंबडवे येथे भेट देत आहेत. यामुळे जिल्ह्यात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.