आजचं राशीभविष्य, शनीवार, २९ जानेवारी २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही स्वीकार करा. आज तुमच्यासाठी काय वाढून ठेवले आहे, ते पाहूया……
मेष:–
ताणतणाव बाजूला सारावेत. घरातील गोष्टीत अधिक लक्ष घाला. नवीन मित्र जोडाल. कामात स्त्रियांची मदत घ्याल. मौल्यवान वस्तू खरेदी कराल.
वृषभ:-
कामातील घाई उपयोगाची नाही. वैचारिक स्थिरता ठेवावी. प्रवासात काळजी घ्यावी. संयम बाळगावा लागेल. प्रलोभनांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.
मिथुन:-
कौटुंबिक विचाराला प्राधान्य द्यावे. अपचनाचा त्रास जाणवेल. जोडीदाराचे वर्चस्व राहील. शांतपणे विचार मांडावेत. भौतिक गोष्टींचा फार विचार करू नका.
कर्क:-
भावनेला आवर घालावी लागेल. मुलांचा व्रात्यपणा वाढेल. मैदानी खेळ खेळाल. अंगातील जोम वाढेल. काही कामे विनासायास पार पडतील.
सिंह:-
बौद्धिक दृष्टीने विचार करावा. गूढ गोष्टी जाणून घेण्यात रस दाखवाल. लेखनाला चांगला उठाव मिळेल. लबाड लोकांपासून दूर राहावे. शैक्षणिक कामे पार पडतील.
कन्या:-
तुमच्यातील प्रेमळपणा दिसून येईल. गप्पांची आवड पूर्ण कराल. संभाषण कौशल्य दाखवता येईल. मित्रांचा गोतावळा जमवाल. नातेवाईकांची गाठ पडेल.
तूळ:-
चौकसपणे गोष्टी जाणून घ्याल. ज्ञानात भर पडेल. सतत काहीनाकाही विचार करत राहाल. योग्य परीक्षण करावे लागेल. उत्तम लिखाण करता येईल.
वृश्चिक:-
कमिशनच्या कामातून लाभ मिळवाल. बौद्धिक दृष्टीने विचार मांडाल. सर्वांशी लाघवीपणे बोलाल. चिकाटी सोडू नका. जुनी कामे डोकेवर काढतील.
धनु:-
सर्वबाबी जाणून घेण्याचा प्रयत्न कराल. हजरजबाबीपणा दाखवाल. गोड बोलून कामे पूर्ण करून घ्याल. अति चिकित्सा करू नका. कामात तत्परता दाखवावी.
मकर:-
अघळपघळ बोलू नये. धार्मिक गोष्टीत लक्ष घालाल. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. आपल्याच मतावर आग्रही राहू नका. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील.
कुंभ:-
गप्पीष्ट लोकांमध्ये वावराल. लहनांशी मैत्री कराल. मित्रांच्या ओळखीचा लाभ होईल. मोठ्या लोकांमध्ये उठबस वाढेल. दिवस मानाजोगा जाईल.
मीन:–
बौद्धिक चातुर्य दाखवाल. कल्पकतेने विचार कराल. पुढील परिस्थितीचा योग्य अंदाज घ्यावा. व्यवहार चातुर्य दाखवाल. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल.