इचलकरंजी: भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये बहुमोल योगदान देणारे देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या खुनाचे समर्थन करणारा ‘व्हाय आय किल्ड गांधी’ हा चित्रपट महाराष्ट्रात ३० जानेवारी २०२२ ला प्रदर्शीत करणेचा घाट घातला जात आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधीनी अहिंसक पध्दतीने देशाला स्वांतत्र्य मिळवून दिले व ब्रिटिश साम्राज्यावाद्यांच्या जोखडातून मुक्त करण्याचे काम केले. त्यांच्या या अहिंसक मार्गाने स्वातंत्र्य मिळवण्याचा आदर्श जगभरामध्ये ठेवला गेला आहे. सबंध जगामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर त्या-त्या देशातील ज्येष्ठ साहित्यिकांकडून साहित्य लिहले गेले.तथापी भारतातल्या काही शक्ती जाणीवपुर्वक महात्मा गांधीना बदनाम करुन त्यांच्या हत्येचे समर्थन करीत आहेत. अशा विकृती मधून महाराष्ट्रातील तरुण पिढी समोर विकृत आदर्श निर्माण केला जात आहे व देशामध्ये व राज्यात फुट पाडण्याचे उद्योग चालू केले आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली चाललेल्या या प्रवृत्तीला वेळीच रोखने आवश्यक आहे.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले यांनी सदरचा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शीत करु नये असे निवेदन मा. मुख्मंत्र्यांना दिलेले आहे.
त्याचाच भाग म्हणून इचलकरंजी शहर काँग्रेसच्या वतीने हा चित्रपट महाराष्ट्रात तसेच इचलकंजी शहरात कोठेही प्रदर्शीत करु नये या बाबत निवेदन देण्यात आले. याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी यांना देण्यात आले अन्यथा तीव्र अंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.