वाटेगांव: वाळवा येथील पश्चिम भागातील खोरी मळ्यात शिवाजी शंकर गावडे यांच्या शेतात बिबट मादीने जन्म दिलेल्या पिल्याला रात्रीच उचलून न्हेल्याचा प्रकार वनविभागाने लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला.
त्यामुळे गावडे यांच्यासह ऊसतोड मजुरांनी व प्राणी मित्रांनी सुटकेचा निश्वास सोडला .वाटेगांव ता.वाळवा येथील शिवाजी गावडे यांच्या गट नंबर .९०५ या ऊसाच्या शेतामध्ये मंगळवारी दुपारी ऊस तोडणी मजुरांना बिबट मादी व बछडा दिसल्याने ऊसतोड थांबवली.यावेळी ऊस पेटवणे, किंवा बिबट्याला हाकलून लावणे असा विचार काहींनी व्यक्त केला.परंतु येथील वनविभाग अधिकारी व प्राणी मित्रांनी येथील लोकांचे प्रबोधन केले.सायंकाळी वन विभागास कळविताच घटनास्थळी सुरेश चरापले वनपाल इस्लामपूर ,वनरक्षक अमोल साठे व वनमजूर यांनी जावून ऊस तोड मजूर व ग्रामस्थ यांना मार्गदर्शन व जनजागृती करुन बिबट वन्यप्राण्यापासुन स्वरंक्षण बाबत मागदर्शन केले.