गाव आलं गोत्यात १५ लाख खात्यात…….. रिलीज ची तारीख ठरली

प्रत्येक गावाची कुठची ना कुठची गोष्ट असतेच. मराठ – वाड्यातील सालई मोकासा या एका अविकसित मागास गावातील इरसाल माणसांची इरसाल गोष्ट ‘गाव आलं गोत्यात 15 लाख खात्यात’ धमाल हा चित्रपट ४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

गणपत रावजी म्हैसने, प्रशांत प्रकाश चंद्रिकापुरे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे चित्रपटाच्या आवडीतून ही सारी मंडळी एकत्र आली आहेत. झिरा फिल्म प्रॉडक्शनच्या बॅनरअंतर्गत बनवण्यात आलेला गाव आलं गोत्यात १५ लाख खात्यात या चित्रपटात प्रेक्षकांना एक मनोरंजक धमाल कथा पहायला मिळणार आहे. सालई मोकासा या गावातील गोप्याची ही गोष्ट आहे. मुलखाचा आळशी आणि वेंधळा असणारा गोप्या आपल्या कुटुंबासहित राहत असतो. चुकीच्या आणि अर्ध्या माहितीतून गोप्या सगळ्यांनाच अडचणीत आणतो. त्याच्या एका चुकीने सगळं गावचं गोत्यात येतं? ‘प्रत्येकाला १५ लाख मिळणार’ या घोषणेने गावात एकच गोंधळ उडतो. त्यानंतर काय घडतं? हे चित्रपटात बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.