शिराळा : शिराळा तालुक्यातील मोहरे व सय्यदवाडी येथे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी 25/15 योजनेतून मंजूर केलेल्या विकास कामांचा शुभारंभ विराज नाईक यांच्या शुभहस्ते झाला.
आमदार नाईक यांनी वरील दोन्ही गावात प्रत्येकी 10 लाख रुपये खर्चाची अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण कामांसाठी 20 लाख रुपये मंजूर केले आहेत. त्या कामांचा शुभारंभ श्रीफळ फोडून व कुदळ मारुन सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या शुभहस्ते झाला.
यावेळी सय्यदवाडी येथील उपस्थित दिनकर दिंडे, मधुकर आस्कट, संजय कवठेकर, शिवाजी आस्काट, प्रकाश मकामले, रवि कुंभवडे, जहांगीर मोकाशी, महादेव पाटील, काळुंद्रेचे सरपंच विजय पाटील, मारुती पाटील, बाळासो आस्कट, अशोक चांदणे तसेच मोहरे येथे सरपंच वसंत पाटील, उपसरपंच दिनकर कुंभार, ग्रामपंचायत सदस्य भगवान पाटील, माजी उपसरपंच तानाजी पाटील आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.