भाजपा युवा मोर्चा इचलकरंजी व वडगाव मंडलाच्या वतीने विद्यापीठ बचाव आंदोलन

इचलकरंजी/ मन्सूर अत्तार : महाविकास आघाडी सरकारने नव्याने केलेल्या विद्यापीठ कायदा मागे घ्यावा तसेच या नवीन विद्यापीठ कायद्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जाण्याची शक्यता आहे, विद्यापीठात राजकीय हस्तक्षेप होवू नये यासाठी हा कायदा मागे घ्यावा यासाठी संपूर्ण राज्यभर महाविकास आघाडी सरकारचे आमदार, मंत्री यांच्या दारात विद्यापीठ बचाव आंदोलन रांगोळी काढून, निषेधाचे फलक घेऊन आंदोलन करण्यात आले.

हातकणंगले मतदार संघातील महाविकास आघाडी आमदार राजुबाब आवळे यांच्या जवाहर नगर, इचलकरंजी येथील निवासस्थाना बाहेर भारतीय जनता युवा मोर्चा व युवती मोर्चा इचलकरंजी, वडगाव, हातकणंगले मंडल वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुदर्शन पाटसकर, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष अरविंद माने, भाजप युवा मोर्चा इचलकरंजी अध्यक्ष प्रवीण पाटील, सरचिटणीस अरविंद चौगले, सुजय पवार, भाजप युवती मोर्चा सह संयोजिका उमा ठिगळे, गीतांजली राजमाने, भाजप युवा मोर्चा पदाधिकारी मनोज तराळ, हेमंत वरूटे, प्रवीण बनसोडे, सुधाकर हेब्बाळे, अर्जुन शिंदे, विशाल माने, उमेश गोरे, प्रवीण रावळ, सतीश लाड, तुषार टेकाळे, प्रवीण रांगोळे, शिवाजी पुजारी, तसेच भाजप युवती मोर्चा पदाधिकारी पुजा सूर्यवंशी, स्वाती फातले, प्रियंका डोईफोडे, दिया फातले आदी भाजप युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.