राजकीय नेत्यांकडून जाधव कुटुंबीयांचे सांत्वन

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीबाबत सर्वांना विश्वासात घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला तर कॉग्रेस पक्ष जाधव कुटूंबाच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे, असा आधार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला.

उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज स्वर्गीय आमदार चंद्रकांत जाधव यांच्या घरी भेट देऊन जाधव कुटुंबीयांचे सांत्वन केले.

दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली.यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, जयश्री जाधव, संभाजी जाधव, सत्यजित जाधव यांच्यासह जाधव कुटुंबियातील इतर सदस्य उपस्थित होते.