इचलकरंजीत अवैध गुटखा वाहतुकीवर कारवाईत १३ लाखाचा मुद्देमाल जप्त.एकास अटक

मन्सूर अत्तार ; इचलकरंजी : इचलकरंजी शहरात शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील सपोनि भालचंद्र देशमुख व पोउनि राजेंद्र यादव यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संभाजी चौक ते शाहू पुतळा रोडवर अशोक लेलँड या पिकअप गाडीतून अशोक हिरारामजी देवडा वय ४५ मूळ गाव पांडा,राजस्थान सध्या आळते याच्याकडून दोन प्रकारच्या गुटख्याची ११९ बारदाने अंदाजे किंमत साडे नऊ लाख व साडे तीन लाख रुपयांचे वाहन व इंटेल कंपनीचा साधा मोबाईल असा साधारण १३ लाख १ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त.

आरोपीस ताब्यात घेतले असून या प्रकरणी राजु पांडव हातकणंगले हा फरारी असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली.

सदरची कारवाई जिल्हापोलिसप्रमुख शैलेश बलकवडे,अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बाबुराव महामुनी, अतिरिक्त कार्यभार रामेश्वर वैजने यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. महादेव वाघमोडे, सपोनि भालचंद्र देशमुख, पो उ नि राजेंद्र यादव,पोना रुपेश कोळी,पोकॉ प्रविण कांबळे,सुनील बाईत, गजानन बरगाले, अरविंद माने यांनी केलेली आहे. सदरच्या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव हे करीत आहेत.