हिंदीत रोजगाराच्या संधी अनेक : दुड्डे केएमसी काॅलेजमध्ये विश्व हिंदी दिवस उत्साहात

कोल्हापूर : हिंदी ही देशाची सर्वमान्य भाषा असून आता ती विश्वभाषेत स्थान प्राप्त करत आहे. या भाषेतून जागतिक पातळीवर रोजगाराच्या अनेक संधी वाढत असल्याचे प्रतिपादन भाषेचे अभ्यासक डाॅ. संघप्रकाश दुड्डे यांनी व्यक्त केले. ते येथील यशवंतराव चव्हाण काॅलेजमध्ये विश्व हिंदी दिवसनिमित्त आयोजित व्याख्यानात ‘फेसबुक लाईव’वर सोलापुरातून बोलत होते.

हिंदी विभागाच्यावतीने तीन दिवस केएमसी काॅलेजमध्ये विविध स्पर्धा, व्याख्यान, भित्तीपत्रिकेचे उद्घाटन इत्यादी कार्यक्रम पार पडले. प्र. प्राचार्य डाॅ. अरुण पाैडमल यांच्या हस्ते विविध विषयांवर आधारित ‘उमंग’ भित्तीपत्रिकेचे उद्घाटन करण्यात आले. पोस्टर प्रदर्शनी स्पर्धेत गाैरी शिवणकर, काजल यादव, ऋषिकेश जाधव, तर निबंध स्पर्धेत ओमकार बामणे, रत्नाली कांबळे, वैष्णवी जाधव यांनी अनुक्रम प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त केला. ‘गुगल मीट’वर घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. हे कार्यक्रम हिंदी विभागप्रमुख प्रा. किरण भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. यासाठी प्रा. सारिका कांबळे, डाॅ. भाग्यश्री पाटील, डाॅ. ज्योस्ना शिवणकर, प्रा. आर आर मांगले, प्रा. आर. एस. दामुगडे यांचे सहकार्य लाभले. कॅप्शन :कोल्हापुरातील केएमसी काॅलेजमध्ये विश्व हिंदी दिवसनिमित्त भित्तीपत्रिकेचे उद्घाटन प्र. प्राचार्य डाॅ. अरुण पाैडमल यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रा. अनिल मुडे, प्रा. किरण भोसले, डाॅ. प्रकाश मुंज, प्रा. सारिका कांबळे, उपस्थित होते.