राळेगणसिद्धी: नारायण पवार हे गेली वीस वर्षे या संघटनेचे काम करीत आहेत 2007 पासून त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सांभाळली आहे 2013 च्या जनलोकपाल आंदोलनानंतर माननीय अण्णा हजारे यांनी ही संघटना बरखास्त केली होती.
त्यानंतर महाराष्ट्रातील जनतेच्या आग्रहाखातर पुनश्च संघटनेच्या कामाला सुरुवात केली राळेगणसिद्धीतील भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन ट्रस्टच्यावतीने महाराष्ट्राच्या विभागीय बैठका घेतल्या कार्यकर्त्यांशी विचार विनिमय केला आणि त्यानंतर दोन जानेवारीला राळेगणसिद्धी येथे आदरणीय अण्णा हजारे यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय समितीची बैठक झाली. त्या बैठकीत जिल्हाध्यक्षांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. नारायण पोवार यांनी आंदोलनाच्या वतीने अनेक मोर्चे आंदोलने कोल्हापुरात यशस्वीपणे पार पाडली आहेत. त्यातील काही प्रमुख आंदोलना पैकी कोल्हापूर विमानतळांच्या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचे आंदोलन तीन वर्षे लढून यशस्वीपणे पार पाडले. आणि त्या शेतकऱ्यांना 80 कोटी रुपये इतकी नुकसान भरपाई मिळवून दिली. त्याच बरोबर व्यवसायातील पतसंस्थांच्या ठेवीदारांना दोनशे कोटी पॅकेज मिळवून देण्यामध्ये ही त्यांचा सहभाग होता. त्याचबरोबर या समितीच्या जिल्हा समिती वर ठेवीदार प्रतिनिधी म्हणून आजही ते काम करत आहेत. त्यांच्या या सर्व कार्याची नोंद घेऊन त्यांची कोल्हापूरच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे.