कोरोनाची लक्षणे नसतील तर चाचणी करण्याची गरज नाही, असे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने आज स्पष्ट केले. आयसीएमआरने आज नवी नियमावली जाहीर केली.
लक्षणे नसलेले रुग्ण, घरी विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केलेले रुग्ण, कोविड सेंटरमधून डिस्चार्ज मिळालेले रुग्ण तसेच आंतरराज्य प्रवास करणाऱ्या व्यक्ती यांना कोरोना चाचणी करण्याची गरज नाही, असे या नियमावलीत नमूद आहे. कफ, ताप, तोंडाला चव नसणे, वास न येणे, दम लागणे आणि श्वसनाचा अन्य कोणताही त्रास जाणवला तर चाचणी करावी. परदेशातून हवाईमार्गे, जलमार्गे देशात येणाऱ्या व्यक्तींची चाचणी करण्यात यावी, चाचणीअभावी शस्त्रक्रिया आणि प्रसूतींना विलंब लावू नये, चाचणीची सुविधा नसेल तर रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात पाठवू नये, प्रसूतीसाठी दाखल महिलांना कोरोनाची लक्षणे नसतील तर त्यांची चाचणी करू नये असे या नियमावलीत म्हटले आहे.