मुंबई वृत्तसंस्था : बॉलिवूडमध्ये अशी एकही अभिनेत्री नसेल जिला बॉलिवूड सुपरस्टार शाहरुखसोबत काम करण्याची इच्छा नसेल? पण एक अभिनेत्री आहे जिने त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करण्यास नकार दिला होता. ही अभिनेत्री म्हणजे दाक्षिणात्य चित्रपटांची लेडी सुपरस्टार म्हणजेच नयनतारा.
तिला शाहरुख खानच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’मधील दीपिका पदुकोणच्या भूमिकेसाठी नव्हे तर ‘वन टू थ्री फोर’ गाण्यासाठी ऑफर देण्यात आली होती. हे गाणं नंतर प्रियामणीवर चित्रित करण्यात आले होते. पण त्यापूर्वी अभिनेत्री नयनताराने नम्रपणे ही ऑफर नाकारली. मात्र, त्यामागचे कारण तिने सांगितले नव्हते. नयनताराने चेन्नई एक्सप्रेसमध्ये काम करण्यास का नकार दिला, याबद्दलचं कारण समोर आलं नाही.पण शाहरुखसोबत काम करण्यास नकार देणारी ती पहिलीच अभिनेत्री असावी, असं म्हटलं जातं.
नयनताराने काम करण्यास नकार दिल्यानंतर यासंदर्भात अनेक चर्चा देखील रंगल्या.त्यानुसार, नयनताराने हा चित्रपट शाहरुख खान किंवा रोहित शेट्टीमुळे नाही तर प्रभूदेवामुळे नाकारल्याचं म्हटलं गेलं.या गाण्यातील गाणी प्रभुदेवाने कोरिओग्राफ केली होती.
अभिनेत्री नयनतारा आणि प्रभुदेवा यांचा अफेअर होता.नयनताराने प्रभुदेवाशी लग्न करण्यासाठी ख्रिश्चन धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला होता.तर, प्रभुदेवाने तिच्यासोबत लग्न करण्यासाठी पत्नीला घटस्फोट दिला होता.मात्र, त्यानंतर नयनतारा आणि प्रभूदेवा दोघंही वेगळे झाले.सध्या नयनतारा दिग्दर्शक विग्नेश सिवनसोबत रिलेशनशीपमध्ये आहे.