कागल : राज्यातील सर्व कृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या न्याय मागणीसाठी शिवाजी विद्यापीठ सेवक संघ व महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ यांचे वतीने 18 डिसेंबर 2021 पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनास आज भाजपचे जिल्हाध्यक्ष राजे समरजित सिंह घाटगे यांनी भेट दिली व त्यांचे म्हणणे सविस्तर पणे ऐकून घेतले व मागण्यांचे निवेदन स्वीकारले.
आंदोलनकर्त्यांनी श्री घाटगे यांच्यासमोर सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे रद्द केलेले शासन निर्णय पुनर्जीवित करणे, कृषी विद्यापीठातील राहिलेल्या 796 पदांना सातवा वेतन आयोग लागू करणे,तसेच 58 महिन्याच्या वेतन फरकासह अन्य राज्य शासनाशी निगडित शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता करणे, आदी मागण्यांचा पाढा वाचला व या आंदोलनाचे गांभीर्य श्री घाटगे यांना सविस्तर सांगितले व शासन स्तरावर हा विषय मांडण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती केली. श्री घाटगे यांनी या प्रलंबित मागण्यांची शासन स्तरावर सोडवनुक होण्याच्या दृष्टीने स्वतः या प्रश्नात लक्ष घालून विरोधी पक्ष नेते माननीय देवेंद्र फडणीस देवेंद्र फडवणीससाहेब यांच्या माध्यमातून तुम्हाला न्याय मिळवून देईन असे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले. यावेळी अजय देशमुख ,संदीप शिरवाडकर, प्रभाकर धर्माधीकारी, मिलिंद भोसले ,आनंदराव खामकर, प्रशांत साळुंखे ,राम तुपे, विशांत भोसले आदी उपस्थित होते.