कोल्हापूर शहरातील विविध चार प्रभागांमध्ये रस्ते आणि ड्रेनेज लाईनच्या कामाला युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते सुरूवात

कोल्हापूर:कोल्हापूरशहरातील सर्व वॉर्डामध्ये अंतर्गत रस्ते आणि ड्रेनेज लाईनची पायाभूत सुविधा निर्माण करून नागरिकांना उत्तमोत्त सुविधा देण्यासाठी युथ आयकॉन कृष्णराज महाडिक प्रयत्नशिल आहेत. त्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून विविध प्रभागातील कामे करण्यात येत आहेत.    या अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ८ भोसलेवाडी कदमवाडी मध्ये योगेश पाटील घर ते मंडलिक घर रस्ता डांबरीकरणाचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याचा शुभारंभ कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी माजी नगरसेवक संजय निकम, चंद्रकांत घाडगे, वैभव माने, उमेश माने, धीरज पाटील, किशोर पवार, प्रवीण वाघमारे, सोनल वाघमारे, पंकज किडगावकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली आपण शहराच्या विकासासाठी कटीबध्द असून शहराला पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात कमी पडणार नाही, अशी ग्वाही कृष्णराज महाडिक यांनी दिली. त्यानंतर प्रभाग क्रमांक ४५ अंतर्गत कैलासगडची स्वारी परिसरात मंगळवार पेठेतील सुबराव गवळी तालीम पासून ते पद्मावती चौकापर्यंतच्या ड्रेनेज लाईनचे काम नगरोत्थान महाअभियानांतर्गत २० लाख रुपयांच्या निधीतून करण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभही कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाला संतोष महाडिक, अभिजीत पाटील, प्रसाद जाधव, संपत जाधव, उदय पाटील, निवास शिंदे, बाळासाहेब पाटील, मिलिंद गुरव कुणाल शिंदे, युवराज कुरणे, आर्यनील जाधव, आणि श्रीधर पाटील यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती. त्याचप्रमाणं प्रभाग क्रमांक ७, सदर बाजार परिसरातील अग्निहोत्री घर ते ईगल पाईप रस्ता, कापसे कॉलनी मार्गाचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याचा शुभारंभ महाडिक यांच्या हस्ते झाला. यावेळी संजय निकम, सुनील नाणिवडेकर, महावीर मंगदुम, अ‍ॅड. डी. बी. कापसे, एन.जी. पाटील आणि अजिंक्य तरुण मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान प्रभाग क्रमांक ६२ बुध्द गार्डन परिसरातील आयडीयल सोसायटीमध्ये अशोक साळोखे यांच्या घरापासून ते रेसिडेन्सि मित्र मंडळापर्यंतच्या मार्गावर गटार बांधकामासाठी २० लाख रुपये निधी देण्यात आला आहे. त्याचीही सुरूवात कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते झाली. या शुभारंभ वेळी रणजित कांबळे, रविकिरण गवळी, प्रेम रजपुत, मोहन जाधव, मंगलताई निपाणीकर, राजू खडके, जय खडके, सुनिल देशपांडे, सनी आवळे, महेश खडके, महेश जाधव, अभि सावंत, प्रभूराज भोसले यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

कुसुम ऑलिम्पियाड इचलकरंजी या नवीन वास्तूचे उद्घाटन-आ. राहुल आवाडे

कुंभोज (विनोद शिंगे) कुसुमताई बाल व प्राथमिक विद्या मंदिर, इचलकरंजी आणि मणेरे हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज, इचलकरंजी यांच्या अंतर्गत उभारलेल्या कुसुम ऑलिम्पियाड, इचलकरंजी या नवीन वास्तूचे उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात…

हसन मुश्रीफ यांना कुंभोज मधील गावठाण वाढ प्लॉटचे ७/१२ करणेबाबत संदेश भोसले यांनी दिले निवेदन

कुंभोज(विनोद शिंगे) कुंभोजमधील गावठाण वाढ प्लॉटला भोगवटदार म्हणून महाराष्ट्र शासनाचे नाव असलेने सदर प्लॉटधारकांना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेता येत नसलेने नागरिकांत तीव्र नाराजी आहे.. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संदेश…

शौमिका महाडिक यांच्या हस्ते शिरोली ग्रामपंचायतीच्या नूतन ग्राम सचिवालय इमारतीचे भूमिपूजन

कोल्हापूर : शिरोली ग्रामपंचायतीच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या नूतन ग्राम सचिवालय इमारतीचे भूमिपूजन शौमिका महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. लवकरच या ठिकाणी ग्रामसचिवालयाची सुसज्ज इमारत उभी राहील आणि नव्या अत्याधुनिक इमारती…

आ.राहुल आवाडेंच्या हस्ते बालाजी चौक ते रुग्गे मळा या परिसरातील रस्त्याच्या विकासकामाचा शुभारंभ

कुंभोज (विनोद शिंगे) माजी मंत्री व मा. आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या फंडातून विक्रम नगर बालाजी चौक ते रुग्गे मळा या परिसरातील रस्त्याच्या विकासकामाचा शुभारंभ आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांच्या…

माझ्या सर्व निवडणुकीचे सारथ्य भैय्या माने यांनी केले : मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) गटाचे सरसेनापती प्रताप उर्फ भैयासाहेब माने यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त भैय्या माने व सविता माने यांना मंत्री…

चर्मकार समाजाच्या वतीने आ. अशोक माने यांचा सत्कार

कुंभोज  (विनोद शिंगे) राष्ट्रीय चर्मकार महासंघ कोल्हापूर जिल्हा समस्त चर्मकार समाज शिरोळ तालुका यांच्याकडून हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे नूतन आमदार दलितमित्र डॉ अशोकराव माने, रेखा अशोकराव माने व स्वीय सहायक सुहास…

हातकणंगले तालुक्यामधील बांधकाम कामगारांचे तालुका सुविधा केंद्र बनले धोकादायक!

कुंभोज प्रतिनिधी :- (विनोद शिंगे) हातकणंगले तालुक्यामधील बांधकाम कामगारांचे तालुका सुविधा केंद्र बनले धोकादायक कामगारांचा जीव धोक्यात सांगली कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गालगत आहे .हे सुविधा केंद्र अन्यत्र ठिकाणी हलवण्याची बांधकाम कामगार…

कै.शिवाजी तांदळे यांच्या ३३ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध कार्यक्रम 

पुणे – पुणे खडकवासला येथे युवा लहुजी संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण (तात्या) तांदळे यांचे वडील कै शिवाजी तांदळे यांच्या ३३ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त युवा संघर्ष सेनेच्या वतीने वृक्षारोपण, कॅलेंडर…

कुंभोज येथे मुख्यमंत्री सडक योजनेचे उद्या अमल महाडिक यांच्या हस्ते उद्घाटन

कुंभोज  (विनोद शिंगे) कुंभोज (ता.हातकणंगले) येथे सकलात साहेब पीर ते नरंदे हा जवळजवळ साडेतीन किलोमीटरच्या रस्त्यासाठी आमदार अमल महाडिक यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जवळजवळ अडीच कोटी रुपयांचा निधी प्राप्त…

🤙 8080365706