उमेद ने केली ‘त्यांची’ दिवाळी गोड

कोपार्डे (प्रतिनिधी) : उमेद फौंडेशन या सामाजिक संस्थेमार्फत सामाजिक बांधिलकीतुन कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यात झोपड्या आणि पालात माळावर राहणाऱ्या ५०० वंचित कुटुंबांना दिवाळी फराळ वाटप करून वंचितांच्या दारी दिवाळी साजरी…

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग बनला मृत्यूचा सापळा

प्रयाग चिखली (प्रतिनिधी) : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील रजपुतवाडी (ता.करवीर) येथील रस्तावर मोठे खड्डे पडल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. हे खड्डे लक्षात येण्यासाठी येथील तरुणांनी रस्त्यावर बॅरिकेट्स लावली आहेत. तरीही…

मधमाशांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू !

आजरा (प्रतिनिधी) : मधमाशांच्या हल्ल्यात मेंढोली (ता.आजरा) शेतकऱ्याचा मृत्यू झाला. नानू जोतिबा कोकीतकर (वय ८०) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते शेळी चारण्यासाठी गेले असता मधमाश्यांनी सहा शेळ्यांसह त्यांच्यावर हल्ला…

वसुबरसनिमित्त गाय-वासरूचे पुजन  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : फुलेवाडी रिंगरोड येथील तामजाई काँलनी मधील सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील यांच्या घरी वसुबरसनिमित्त गाय-वासरूंची पुजा आयोजित करण्यात आली होती. भारतीय संस्कृतीत गाईला असाधारण महत्त्व आहे. गाय व…

शेतकऱ्यांना अनुदान मिळाले यातच आमची दिवाळी गोड झाली-समरजित घाटगे

सेनापती कापशी (प्रतिनिधी) : महाविकास आघाडी सरकारने प्रामाणिकपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान न देता तोंडाला पाने पुसली. मात्र,शिंदे-फडणवीस सरकारने हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले.यामुळेच शेतकऱ्यांची दिवाळी…

समरजीत घाटगे यांच्या पाठपुराव्यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान जमा

कागल (प्रतिनिधी) : येथील रमाई आवास योजनेतील अनेक लाभार्थ्यांचे अनुदान मंजूर होऊन केवळ राजकीय अनास्थेपोटी बऱ्याच वर्षांपासून पासून रखडले होते. या योजनेतील लाभार्थ्यांनी शासकीय कार्यालयामध्ये अनेक हेलपाटे घालून कोणीही त्यांची…

संभाजीराजेंनी बांधावर जाऊन घेतली शेतकऱ्यांची भेट

बीड (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यातील वैतागवाडी (विजयानगर) येथे छत्रपती संभाजीराजे यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. सज्जन भानुदास दिसले यांच्या शेताला भेट देवून त्यांनी परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त…

कोल्हापुरात जागतिक पांढरी काठी दिन साजरा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्रच्या वतीने १५ ऑक्टोबर हा दिवस जागतिक पांढरी काठी दिन म्हणून साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त रविवार (दि.१६ ऑक्टोबर) रोजी संघाच्या वतीने जनजागृती फेरी…

दिवाळीत गांधीनगरमध्ये वाहतुकीची कोंडी होऊ नये; करवीर शिवसेनेची मागणी

गांधीनगर : दिवाळी सणाला गांधीनगरमध्ये खरेदीसाठी वाहतुकीची कोंडी होऊ नये तसेच ग्राहकाला सर्वत्र खरेदी करता यावे याबाबत योग्य ती उपाय योजना करावी, अशी मागणी करवीर शिवसेनेच्यावतीने गांधीनगर पोलीस ठाण्याकडे निवेदनाद्वारे…

मराठा भवनसाठी लागेल ते सहकार्य करू-आ.हसन मुश्रीफ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात मराठा भवन उभारण्यासाठी पडेल ती किंमत मोजू आणि वसंतराव मुळीक-नाना यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.        अखिल भारतीय मराठा…