शक्तीपीठ महामार्ग विरोधात एक जुलैला राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन

कोल्हापूर : शेतकऱ्यांच्यावर लादण्यात येतं असलेल्या शक्तीपीठ महामार्ग विरोधात, कृषी दिना दिवशी एक जुलैला रस्त्यावर उतरण्याचा निर्णय आज गुरुवारी ऑनलाईन झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानुसार शक्तीपीठ विरोधात एक जुलैला सर्व…

शक्तीपीठ महामार्गावरून आमदार सतेज पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल..

कोल्हापूर : विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी, शक्तीपीठ महामार्गावरून राज्य सरकारवर हल्लाबोल केला. महाविकास आघाडी म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणार असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले. मंत्री हसन…

कोल्हापूरी चप्पलच्या रक्षणासाठी कृष्णराज महाडिक यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, इटलीतील फॅशन शो मध्ये विनापरवाना कोल्हापूरी चप्पलची नक्कल केल्याबद्दल कारवाई मागणी

कोल्हापूर:कोल्हापूरी चप्पलची परस्पर नक्कल होवू नये आणि स्थानिक चर्मकार कारागिरांच्या हक्कांवर गदा येवू नये, यासाठी आज युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. इटलीतील मिलान शहरातील एका फॅशन शो मध्ये, प्राडा या आंतरराष्ट्रीय कंपनीने थेट कोल्हापूरी चप्पलची हुबेहुब डिझाईनची कॉपी केली आहे. वास्तविक २०१९ मध्येच भारत सरकारने कोल्हापूरी चप्पलला जिआय टॅग दिला आहे. त्यामुळे प्राडा कंपनीकडून कोल्हापूर चप्पलची कॉपी करून, स्थानिक कारागिरांवर अन्याय केला जातोय, त्यामुळे महाराष्ट्र सरकारने याप्रकरणी लक्ष घालावे, अशी विनंती कृष्णराज महाडिक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. २३ जूनला इटलीमध्ये झालेल्या एका प्रख्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फॅशन शो मध्ये कोल्हापुरी चप्पलचा वापर करण्यात आला. कोल्हापूरच्या चर्मकार कारागिरांसाठी हा एक सुखद धक्का होता. मात्र फॅशन शो आयोजकांनी कोल्हापूरी चप्पलचा असल्याचा कुठेही उल्लेख केला नाही किंवा प्रदर्शनासाठी कायदेशीर परवानगी घेतली नाही. वास्तविक २०१९ मध्येच कोल्हापूरी चप्पलला  जिओ टॅगींग करून, एकप्रकारे कोल्हापूरी चप्पल बॅ्रँडचे आंतरराष्ट्रीय रजिस्ट्रेशन झाले आहे. अशा परिस्थितीत आज कोल्हापुरातील काही चर्मकार कारागिरांना घेवून, युवा नेते कृष्णराज महाडिक  यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. कोल्हापूरी चप्पल ही कोल्हापूरची आणि महाराष्ट्राची ओळख आहे. या चप्पलला भारत सरकारनं जिआय टॅग दिल्याने, त्याचे उत्पादन ठराविक क्षेत्रात नोंदणीकृत कारागिरांकडूनच होवू शकते. अशा परिस्थितीत प्राडा या कंपनीने इटलीतील फॅशन शो मध्ये कोल्हापूरी चप्पल सारखीच हुबेहुब डिझाईनची चप्पल सादर केली आणि  त्याचा मुळ उगम किंवा कारागिरांचा कसलाही उल्लेख केला नाही. त्यातून स्थानिक कारागिरांच्या हक्कांवर गदा आल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांसमोर करण्यात आली. कृष्णराज महाडिक यांनी या विषयाचे महत्व आणि गांभीर्य मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर मांडले. अशा पध्दतीने कोल्हापूरी चप्पलच्या कायदेशीर आणि मुलभूत हक्कांवर गदा येत असल्याबद्दल महाराष्ट्र सरकारने तातडीने केंद्र सरकार मार्फत कायदेशीर कारवाईसाठी पावलं उचलावीत आणि कोल्हापूरी चर्मकार बांधवांना न्याय द्यावा, अशी मागणी कृष्णराज महाडिक यांनी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने याप्रश्‍नी  कायदेशीर पावले उचलणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या विशेष कार्यकारी अधिकार्‍यांना याबाबत कायदेशीर कारवाई करण्यासाठी काय करता येईल, याबाबत माहिती घेण्यास सांगितले. कृष्णराज महाडिक यांनी, कोल्हापूरच्या चप्पल कारागिरांना सोबत घेवून, या महत्वाच्या विषयावर थेट भुमिका मांडली. त्याबद्दल कोल्हापुरातील चर्मकार बांधवांनी कृष्णराज महाडिक यांचे आभार मानले आहेत.    

राज्यातील प्रकल्पांचे भूसंपादन ठरलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यातील महत्त्वाच्या सर्व प्रकल्पांचे भूसंपादन ठरलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करून प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावावेत. तसेच भूसंपादनाअभावी एकही प्रकल्प रखडणार नाही याची संबंधित सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना मुख्यमंत्री…

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी नऊ टक्के व्याजदराने कर्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना तसेच विविध महामंडळाअंतर्गत सुरू असलेल्या योजनांमार्फत शासन महिलांचे आर्थिक सबलीकरण करीत आहे. या लाभार्थी महिलांना आता आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी नऊ टक्के अल्प व्याजदराने कर्ज…

अलमट्टी धरणातील पाणीसाठा ५१५ मीटरपर्यंत स्थिर ठेवण्याची राजु शेट्टी यांची मागणी

कुंभोज  (विनोद शिंगे) जून महिन्यात होत असलेल्या संततधारा पावासाने धरणक्षेत्राबरोबर शेतजमीनीतही पाण्याचा निचरा मोठ्या प्रमाणात झालेला आहे. यामुळे यापुढे पडणा-या पावसाचे पाणी थेट नदीमध्ये प्रवाहित होत राहणार आहे. जुलै ,…

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत आढावा बैठक

कोल्हापूर : मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात विविध विषयांवर आढावा बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महापालिका आयुक्त के मंजूलक्ष्मी, अतिरिक्त जिल्हाधिकारी…

आ.राहुल आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा

कोल्हापूर :इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील चंदूर, कबनूर, कोरोची, तारदाळ व खोतवाडी या गावांमध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक आ.राहुल आवाडे यांच्याअध्यक्षतेखाली कोल्हापूर जिल्हा परिषद कार्यालयात…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नाविद मुश्रीफांचा सत्कार

मुंबई : गोकुळ दूध संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष नाविद मुश्रीफ आणि सर्व संचालक महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली.                  …

महावितरण विभागातील विविध प्रलंबित कामांबाबत ऊर्जा दरबार

कोल्हापूर : महाराणी ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे जिल्हा नागरिकांचे महावितरण विभागातील विविध प्रलंबित कामांबाबत ऊर्जा दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. सामान्य नागरिकांचे महावितरण बाबतचे प्रश्न तात्काळ सोडवण्यासाठी उपविभाग…

🤙 9921334545