कोल्हापुरात लव्ह-जिहाद विरोधात जन-आक्रोश आंदोलन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात आज (बुधवारी) लव्ह-जिहाद विरोधात हिंदू जन-आक्रोश आंदोलन करण्यात आले. कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस स्टेशन समोर हे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात भाजपचे आमदार नितेश राणे सहभागी झाले…

बोरपाडळे येथे गॅस टँकर पलटला

पन्हाळा (प्रतिनिधी) : कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर काल रात्री बोरपाडळे गावच्या कमानीजवळ गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झाला आहे. चालकाचा ताबा सुटल्याने हा टँकर पलटी झाला. या अपघातात गॅस टँकरची टाकी लिकेज…

अपघातातील मृत वारकऱ्यांवर सामूहिक अंत्यसंस्कार      

कोल्हापूर (प्रतिनिधी) :मिरज-पंढरपूर महार्गावर जुनोनी (ता.सांगोला) येथे काल (सोमवारी) निघालेल्या पायी दिंडीत भरधाव कार घुसल्याने झालेल्या अपघातात कोल्हापूर जिल्ह्यातील सात जणांचा मृत्यू झाला. या सात पैकी पाच जणांवर आज (मंगळवारी)…

क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर नृसिंहवाडीत !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रख्यात क्रिकेटपटू आणि मास्टरब्लास्टर अशी ओळख असणारे सचिन तेंडुलकर यांनी आज (सोमवारी) पहाटे नृसिंहवाडीतील श्री दत्त मंदिरात काकड आरतीला हजेरी लावल्याचे समजते. यावेळी तेंडुलकर यांच्यासोबत त्यांचा मुलगा…

दिव्यांग विद्यार्थ्यांची राष्ट्रीय एकात्मता दौड संपन्न

कोल्हापूर (प्रातिनिधी) : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज (सोमवारी) दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय एकात्मता दौडचे आयोजन करण्यात आले होते. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत याचे आयोजन करण्यात होते.…

एनसीसीच्या वतीने राष्ट्रीय एकता दिन साजरा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण कॉलेजच्या व ५६ व्या महाराष्ट्र बटालियन एनसीसी कोल्हापूर सेक्टरच्या वतीने राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्यात आला. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी…

ईश्वर फाउंडेशनचा ‘हा’ सामाजिक उपक्रम

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दीपावली सणाचे औचित्य ईश्वर फाउंडेशन व जंगम कृषी उद्योग यांच्या वतीने समाजातील गरजू लोकांना फराळ,पणत्या,रांगोळी,आकाश कंदील तसेच कापडी पिशव्या आदी साहित्यांचे वाटप करण्यात आले. रांगोळी व पणत्या…

लक्ष्मी फाउंडेशनने केली ‘त्यांची’ दीपावली गोड  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दीपावली सणाचे औचित्य साधून गर्जन (ता.करवीर) येथील लक्ष्मी फाउंडेशनने निराधार महिलांना साड्या,आकाशकंदील, फराळ तसेच अन्नधान्य आदी साहित्य दिले. अवनी या सामाजिक संस्थेशी संबंधित असणाऱ्या एकटी या स्वयंसेवी…

रॅम्बो सर्कसच्या संस्थापकांचे निधन !

मुंबई (वृत्तसंस्था): पुण्यातील रॅम्बो सर्कसचे संस्थापकआणि देशातील सर्कस उद्योगाला ऊर्जितावस्था यावी यासाठी झटणारे पी. टी. दिलीप (वय ७४) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.हडपसर येथील सेपल्कर दफनभूमीत आज (शनिवारी) दिलीप यांच्या…

खा.धनंजय महाडिक यांच्यावतीने फराळ स्नेहमिलन  कार्यक्रमाचे आयोजन

कोल्हापूर (प्रतिनिधी): दीपावलीसणानिमित्तसमाजातील विविध घटकांमध्ये स्नेहाचे बंध निर्माण व्हावेत आणि परस्पर संवाद  वाढीस लागावा, या हेतूने खासदार धनंजय महाडिक यांनी  फराळ स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित केला होता. महासैनिक दरबार हॉलमध्ये मंगळवारी झालेल्या या मेळाव्याला आजीमाजी लोकप्रतिनिधींसह विविध क्षेत्रातील  मान्यवरांनी उपस्थिती लावून फराळाचा आस्वाद घेतला. खासदार धनंजय महाडिक यांच्यावतीने दीपावली सणाचे औचित्य साधून, फराळस्नेहमेळावा आयोजित करण्यात आला  होता. खासदार धनंजय महाडिक,अरूंधती महाडिक,पृथ्वीराज महाडिक, विश्वराज महाडिक, कृष्णराज महाडिक यांनी  उपस्थितांचे स्वागत केले.  या कार्यक्रमाला श्रीमंत शाहू महाराज यांनी उपस्थिती लावून महाडिक परिवाराला शुभेच्छा दिल्या. त्यानंतर राज्याचे उच्च तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार संजय मंडलिक, माजी आमदार संजयबाबा घाटगे, भरमूआण्णा पाटील,  संग्रामसिंह कुपेकर, भगवान काटे, समरजितसिंह घाटगे, राहूल चिकोडे, महेश जाधव, अशोक देसाई, डॉ. प्रकाश संघवी, डॉ. अशोक भूपाळी, सुरेशदादा पाटील, भरत पाटील, अरूण इंगवले, सत्यजीत कदम, चंद्रकांत घाटगे, राजसिंह शेळके,  विजयसिंह खाडेपाटील, रशीद बारगीर, रूपाराणी निकम, संगीता खाडे, गायत्री राऊत, रवींद्र मुतगी, नंदकुमार मराठे, हसन  देसाई, सुंदर देसाई, विजया पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी मेळाव्याला उपस्थिती लावली. तर सकाळ समुहाचे  संचालक संपादक श्रीराम पवार, लोकमतचे मकरंद देशमुख, विठ्ठल पाटील, रितेश पाटील, समीर देशपांडे, सतीश सरीकर,  जिल्हा परिषदेचे आजीमाजी पदाधिकारी,साखर कारखान्याचे संचालक, सेवा संस्था- दूध संस्था, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, धनंजय महाडिक  युवाशक्ती चे कार्यकर्ते उपस्थित होते.